पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व शिंदाड ग्रामपंचायत,यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान शिबीर संपन्न “”

0
523

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १३ एप्रिल २०२२
पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामपंचायत, शिंदाड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे रोगनिदान शिबिर आयोजित केले गेले. शिंदाड या परिसरातील या शिबिरात तब्बल २७५ नागरिकांनी लाभ घेतले. हा कार्यक्रम राम मंदिर, शिंदाड येथे सकाळी ८ ते २ पर्यंत ठेवण्यात आला होता. यावेळी डॉ.स्वप्निल प्रल्हादराव पाटील व डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांनी भव्य अश्या रोग निदान शिबिरात २७५ नागरिकांची तपासणी करून औषधोपचार मोफत केले. यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, शिंदाड सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र विक्रम पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप स झालेराफ, धना आपा, विलास पाटील, डॉ. एस. आर.पाटील, डॉ. एल. टी. पाटील, डॉ. दीपक चौधरी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. राजेंद्र परदेशी, शाळा समिती अध्यक्ष संदीप बोरसे, कैलास दादा, बाळू श्रावने, सतिष बोरसे व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या. सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या ह्या भव्य अश्या आरोग्य शिबिरा बद्दल ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी डॉक्टर स्वप्निल पाटील यांचे आभार मानले या शिबिरास रुग्णांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.