तहसिल कार्यालय जामनेर येथे शेतजमीनीचा जाहीर लिलाव

0
364

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १३ एप्रिल २०२२
तहसिल कार्यालय जामनेर येथे शेतजमीनीचा जाहीर लिलाव
जळगाव विशेष भूसंपादन अधिकारी जळगाव यांचेकडील भूसंपादन प्रस्ताव क्र. 40/02 मध्ये वसुलीची रक्कम रु. 48,32,035/- सिध्दार्थ हरी बाविस्कर, विलास हरी बाविस्कर, नाना हरी बाविस्कर, नारायण हरी बाविस्कर आणि कुसुमताई वसंत तांबे रा. पाळधी याचेकडून वसुल करणेबाबत मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी आर.आर.सी निर्गिमित करुन आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु नमुद थकबाकीदार यांनी आजपावेतो सदर वसुलीची रक्कम मा. विशेष भुसंपादन अधिकारी जळगाव यांचेकडे अदा केलेली नसल्यामुळे थकबाकीदार यांचेकडील वसुलीची रक्कम वसुल करणे कामी त्यांची मौजे पाळधी ता. जामनेर येथील शेतजमीन गट क्र. 78/पै./10/ पै क्षेत्र हे 2.44 आर आकार रु. 4.03 पैसे, गट क्र. 614 क्षेत्र हे 1.40 आर आकार रु. 11.16 पैसे पैकी थकबाकीदार यांचे मालकीचे क्षेत्र हे. 0.55.42 आर आकार रु. 4.42 पैसे व गट क्र. 618 क्षेत्र हे. 1.40 आर आकार रु. 11.16 पैसे आणि मौजे पाळधी येथील घर मालमत्ता क्र. 1023 क्षेत्र 490 चौ. फुट व घर मालमत्ता क्र. 1224 क्षेत्र 435 चौ. फुट या जप्त केलेल्या शेतजमीनीचे आणि घर मालमत्तांचे दि. 19 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जाहीर लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा, लिावातील अटी व शर्ती, लिलावातील शेतजमीन, लिलावातील बोलीहातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार जामनेर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार अरुण शेवाळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.