आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १४ एप्रिल २०२२
जवखेडेसिम पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात,गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
जवखेडेसिम गावाचे पहिले लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले,योजनेचे शिल्पकार.
जवखेडेसिम ता.एरंडोल येथील पाणी पुरवठा योजना जलजीवन मिशन अंतर्गत १३ ऑगस्ट २०२१ रोजी मंजूर झाली होती,पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्कालीन लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांच्या पाठपुराव्यामुळे व जवखेडेसिम येथील प्राथमिक विद्यामंदिर च्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात योजनेला गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती, या कार्यक्रमासाठी गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व पालकमंत्री,किशोर अप्पा पाटील आमदार पाचोरा भडगाव, डॉ हर्षल दादा माने जिल्हाप्रमुख शिवसेना जळगाव यांच्यासह एरंडोल तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख व जवखेडेसिम चे भूमिपुत्र वासुदेव पाटील यांची खास उपस्तीती होती,याच कार्यक्रमात गुलाबराव यांनी स्वतंत्र गिरणा नदीवरून जवखेडेसिम गावासाठी योजना मंजुरीची घोषणा केली होती, लगेच योजनेचा सर्व्हे झाला होता ,त्या वेळेस लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांनी एरंडोल पाणीपुरवठा विभागाचे वानखेडे साहेब यांच्या सहकार्याने गिरणा नदी ते जवखेडेसिम गावापर्यंत धुळे येथे खाजगी एजन्सी कढुन सर्व्हे करून घेतला,ऑक्टोम्बर महिन्यात भुजल सर्वेक्षण विभागाकडून गिरणा नदीवर विहिरीची जागा निश्चिती केली ,उपविभाग पाणीपुरवठा एरंडोल यांच्या कडून जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्या कडे प्रत्यक्ष पाठपुरावा केला,तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अजिंठा विश्राम गृह येथे पाणीपुरवठा व पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते तत्कालीन लोकनियुक्त सरपंच यांना प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आला त्या नंतर २१ जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत टेंडर प्रक्रिया पार पडली १ कोटी ५९ लाख रुपयांचे अंतिम टेंडर एरंडोल येथील ठेकेदार अनंत रमेश पाटील यांनी घेतले त्या नंतर मार्च मध्ये कार्यआरंभ आदेश देण्यात आले आज प्रत्यक्षात गिरणा नदीवर विहीर चे उदघाटन करण्यात आले, या योजनेचे शिल्पकार तत्कालीन प्रथम लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले, विद्यमान प्रभारी सरपंच नामदेव मोरे, संदीप भदाणे, सुभाष भिवसन पाटील,मांगीलाल भाईदास चव्हाण, अनिल एकनाथ चौधरी,शिवदास पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील,गुलाब पाटील वॉटरमन, शांताराम दादा व ग्रामस्थ उपस्तीत होते.