ग्रामीण रुग्णालय,पाचोरा येथे भव्य मोफत आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे. आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत दिल्या जातील.

0
476

 

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १८ एप्रिल २०२२
ग्रामीण रुग्णालय,पाचोरा येथे भव्य मोफत आरोग्य मेळावा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व
राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित
भव्य मोफत आरोग्य मेळावा
दिनांक २१/०४/२०२२ रोजी, वार – गुरुवार, वेळ : सकाळी ९ ते दुपारी २ वा. –
ग्रामीण रुग्णालय, पाचोरा येथे आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे.या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी व सर्व सुविधा मोफत दिल्या जातील. डिजीटल हेल्थ आय. डी. (युनिक हेल्थ आय.डी.) आयुष्यमान भारत कार्ड
( आवश्यक कागदपत्रे :- पासपोर्टसाईज दोन फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड,
मतदान ओळखपत्र व मुळ कागदपत्र व सोबत झेरॉक्स प्रत्येकी दोन प्रती) • सर्व रोग मोफत तपासणी (विशेष तज्ञ डॉक्टरांमार्फत ) उदा.: हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुप्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी, लहान मुलांचे आजार, किडणी आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान-नाक, घसा आजार, अस्थिरोग, एच. आय. व्ही. तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग व सर्व आजार मोफत रक्त, लघवी, एक्स-रे व ई.सी.जी.गरजु रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतगत मोफत दिले जातील. आयुर्वेद विभाग अंतर्गत मोफत तपासणी तसेच निरोगी जीवनशैली विषयी आहार, योगा व इतर सल्ला आणि मार्गदर्शन
किशोर वयातील मुला-मुलींसाठी, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या या विषयी सल्ला व मार्गदर्शन. विशेष बाब अंतर्गत :- या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबीर तसेच नेत्रदान, अवयवदान, देहदान, संबंधी
स्वयं इच्छापत्र भरून घेतले जाणार आहेत.
आपले स्नेहांकित ना. गुलाबराव पाटील
(पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगांव)
खा. उन्मेशदादा पाटील (खासदार जळगाव लोकसभा)
आ. किशोरआप्पा पाटील (आमदार पाचोरा-भडगांव)
सहकार्य सदस्य जिल्हा परिषद व पंचायत समिती, पाचोरा मा.नगरसेवक सर्व पाचोरा नगर परिषद * मा.सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत, ता.पाचोरा सर्व वैद्यकिय अधिकारी, प्रा. आ. केंद्र व ग्रामीण रुग्णालय, ता. पाचोरा पाचोरा डॉक्टर असोसिएशन, पाचोरा
डॉ. किरण पाटील
जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव
डॉ. भिमाशंकर जमादार जिल्हा आरोग्य अधिकारी
जि.प. जळगांव
आपले विनित
डॉ. अमित साळुंखे
वैद्यक ग्रामीण रुग्णालय पाचोरा
डॉ. समाधान वाघ तालुका आरोग्य अधिकारी पाचोरा

तरी सदर आरोग्य मेळाव्यात सहभागी होऊन आरोग्य संबंधित योजनाचा लाभ घ्यावा ही विनंती..!