आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, २१ एप्रिल २०२२


पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे भव्य मोफत आरोग्य मेळावा संपन्न. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य राष्ट्रीय अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित आज दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत हा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये सर्व सुविधा मोफत देण्यात आल्या या सुविधे मध्ये हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार व पुरुषांचे आजार ,कॅन्सर गरोदर माता तपासणी ,लहान मुलांचे आजार, किडनी आजार ,मोतीबिंदू ,कान नाक, घसा, आजार, दंतरोग कुष्ठरोग या सर्व आजारांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच मोफत लघवी रक्त तपासणी घेण्यात आली या शिबिरात ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिराला ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात गरजू रूग्णांची आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सुविधा मोफत देण्यात आल्या निरोगी जीवनशैली विषयी आहार योगा इतरांचा सल्ला देण्यात आला विशेष बाब अंतर्गत या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबिर तसेच नेत्रदान, अवयव दान ,देहदान संबंधी उपस्थित मान्यवरांनी सल्ला व मार्गदर्शन दिले सदर शिबिर हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील डॉ भीमा शंकर जमादार यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आलाा.
पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे पाचोरा रुग्णालयाचे डॉ समाधान वाघ, पाचोरा येथील स्पेशलिस्ट डॉ गगन शाबू , एम एस डॉ भरत पाटील ,डॉ लोकेश सोनवणे डॉ इम्रान शेख, डॉअभिषेक जगताप डॉ नानकर ,डॉ भावसार, दंत विभागाच्या डॉ संपदा, डॉ राहुल पटवारी एम डी मेडिसिन,डॉ विजय पाटील यांनी मेहनत घेतली सदर आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये रुग्णालयाचे युनानी विभाग,आर बी एस के विभाग, नेत्र विभाग ,हिवताप विभाग, कुष्ठरोग, व टीव्ही विभाग, लॅब एक्स-रे लसीकरणाचे कर्मचाऱ्यांनी व पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी व आशा सेविका यांनी परिश्रम व मेहनत घेतली