पाचोरा येथे क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांचा २८ नोव्हंबर स्मृती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नुकतेच शहीद झालेले वीर जवान यश देशमुख पिंपळगाव ता. चाळीसगाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व पाचोरा शहरात लवकरच नियोजित जागी महात्मा फुले स्मारक उभारावे ही एकमुखी मागणी करण्यात आली. सामाजिक कार्यकरते आण्णासो. दिपक भावराव शेवरे, पाचोरा यांच्या राजे संभाजी नगर येथील निवास् स्थानी,क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुलेंचे प्रतिमेचे पुजन व अभिवादन करतांना सह पत्नीक सौ. मिनाबाई दिपक शेवरे, तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी संयुक्त प्रतिमा पुजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाभिक समाज माजी.सचिव चिंतामण सिताराम जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले, अखिल भारतीय महात्मा फले समता परिषदेचे जळगाव जिल्हा संघटक शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी महात्मा फुलेंच्या जिवनावर पोवाडा व मनोगत सादर केले, बुध भुषण बुक स्टॉलचे संचालक श्री अनिलजी मराठे साहेब यांनी फुलेंचे पुरोगामी विचार मांडुन जागृती निर्माण केली, छत्रपती शिवाजी ब्रीगेडचे जिल्हा समन्वय रविंद्र पाटील साहेब, छत्रपती शिवाजी ब्रीगेडचे शहर सचिव राजेंद्र मराठे, जितेंद्र पाटील सर, सचिन पाटील साहेब, रविंद्र सखाराम महाजन,लहुजी संघर्श सेनेचे अनिल पाचूंदे, सौ.लीलाबाई पाचुंदे, सौ.मिनबाई शेवरे, सौ.मनिषा बाई महाजन, सौ.उषाबाई महाजन, व बहुजन समाज उपस्थितीत होते. यावेळी उपस्थित मान्य वरांचे आभार दिपक शेवरे यांनी मानले.