“लोकमान्य” पॅनल अ. क्र. २ निशाणी “कपबशी” व लोकमान्य पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे अशी नम्र विनंती ( डॉ. पंकज जाधव)

0
355

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, २७ एप्रिल २०२२

भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे मन मिळावू व सर्वांना हवे हवेसे वाटणारे आरोग्य सेवेतील प्रसिद्ध व परिचीत नाव डॉ.पंकज जाधव यांच्या स्वभावामुळे आरोग्य रुग्णालयांमध्ये त्यांनी केलेली सेवा त्यांचे नाव लौकीक करणारी ठरली असून त्यांच्या स्वभावामुळे सर्व कर्मचारी ही नेहमी खुश असतात सतत ते रुग्णांना सहकार्य करत असतात कुणीही ग्रामीण रुग्णालयामध्ये आल्यावर त्यांना सर्व सेवा देण्याचा प्रयत्न सतत करत राहतात रुग्णांची सेवा करत असताना त्यांना सामाजिक क्षेत्रात व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी काही ठोस काम कराव असे मनात आल्यावर सोसायटी निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्यासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आपण समाजासाठी काही देणे लागतो याचा विश्वास आल्यावर ते निवडणुक लढत असुन त्यांनी लोकमान्य गटातून स्थानिक मतदार संघातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांची मतपत्रिका ही “पांढरी” असून त्यांचा अनुक्रमांक नंबर “२” आहे. त्यांनी मतदारांना विनंती केली आहे.आपले आशीर्वाद व शुभेच्छा “लोकमान्य” गटाचा पाठीशी द्याल याचा मला पूर्ण विश्वास आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपल्याशी प्रत्यक्ष मेळाव्यातून दूरध्वनी आणि व्हाट्सअप इत्यादी प्रकारे संपर्क करत आहोत या व्यतिरिक्त काही मतदार बंधू-भगिनींना आम्ही काही अपरिहार्य कारणाने संपर्क साधू शकलो नाही याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वांना नम्र विनंती की लोकमान्य गटाच्या कप-बशी चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करतो मतदान 28/4/2022 रोजी होणार आहे. तरी आपण आपले मित्र परिवार नातेवाईक यांच्याशी संपर्क करून लोकमान्य गटाला मतदार रुपी आशीर्वाद व साथ द्यावी लोकमान्य पॅनल ला प्रचंड मतांनी विजयी करावे ही मनोभावे विनंती करतो