आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, २७ एप्रिल २०२२
कोव्हीड -19 या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत.
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक-04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय, महसुल व वनविभाग दि. 26 नोव्हेंबर, 2021 अन्वये कोव्हीड -19 या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50,000/- मात्र इतके सानुग्रह सहाय्य देण्याची योजना दि. 01 डिसेंबर, 2021 पासुन ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित करणेत आली आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिनांक- 24 मार्च, 2022 रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक- सीएलएस-2021/प्र.क्र.25/म-3, दिनांक 11 एप्रिल, 2022 अन्वये खालील प्रमाणे आदेश दिलेला आहे.
1) कोव्हीड -19 या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50,000/- इतके
सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेसाठी अर्ज करणेची मुदत पुढीलप्रमाणे राहील. अ) कोव्हिड-19 या आजारामुळे दि. 20 मार्च, 2022 पुर्वी मृत्यु झालेला असल्यास दि. 24 मार्च, 2022 पासुन 60 दिवसाच्या आत म्हणजेच दि. 24 मे 2022 पर्यंत.
ब) कोव्हिड-19 या आजारामुळे दि. 20 मार्च, 2022 पासुन पुढे मृत्यु झाल्यास मृत्युच्या दिनांकापासुन 90 दिवसाच्या आत.
2) या योजनेखाली अर्ज करणेसाठी वर नमुद केलेल्या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गा-हाणे निवारण समिती (GRC) मार्फत करता येतील.
3) या योजनेकरीता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करणेत येईल.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगांव.
प्रत:- जिल्हा माहिती अधिकारी जळगांव.
Home Uncategorized कोव्हीड -19 या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान...