आरोग्य दूत न्यूज रईस बागवान, शहर प्रतिनिधी दि, २८ एप्रिल २०२२
पाचोरा येथे पोलिस स्टेशन, महसूल विभाग व शांतता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न
सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथे आज इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते इफ्तार पार्टीला आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या सोबत प्रशासनाचे प्रांतसाहेब विक्रम बादल उपविभागीय अधिकारी भारत काकडे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, उपनिरीक्षक राहुल मोरे, उपस्थित होते इफ्तार पार्टी मध्ये सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले” इफ्तार” पार्टीचे दर वर्षी रमजान महिन्यात प्रशासनातर्फे शांतता व जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी आयोजन करण्यात येत असते इफ्तार पार्टीचे प्रमुख उद्देश. रमजानच्या रोजाची सांगता इफ्तार ने होते सूर्योदयापूर्वी तांबड फाटण्या पूर्वी पासून तर सूर्यास्तानंतर ची लालसर कांती फिटे पर्यंत दिवसभर रोजा ठेवून सूर्यास्ता नंतर थोडंसं काही खाऊन पाणी प्यायले जाते आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते या सोपस्काराला “इफ्तार” म्हणतात इफ्तारच्या वेळी तहानलेले होठ सुकून त्यावर चढलेली पापडी पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ग्रामीण भागातल्या लोकांची जाणीव करून देते अशाप्रकारे हा रोजा आणि इफ्तार गरिबांना मदत करण्याची प्रेरणा देतो या इफ्तार पार्टीला भरपूर प्रमाणात शहरातील व परिसरातील लोकांनी प्रतिसाद दिला.
इफ्तार पार्टीमध्ये नितीन तावडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक बशिर बागवान, सुधाकर वाघ ,मुस्लिम समाजाचे मौलाना नाईम शेख, सहीद, जावेद शेख, एजाज बागवान एजाज शेख आसीफ मुस्ताक, रशीद देशमुख, ,तौकीर गिरासेे काँग्रेसचे आयचे शेख इरफान, शेख इक्बाल मन्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे रशुुुुल शेेख उस्मान, इ. पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होतेे. पोलीस कर्मचाऱ्यांनी व महसूल प्रशासनाने अधिक परिश्रम घेतले