नांद्रा येथील कवी-स्वप्नील बाविस्कर यांचा मुंबई येथे साहित्यभूषण पुरस्काराने सन्मान

0
311

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, २९ एप्रिल २०२२
नांद्रा येथील कवी-स्वप्नील बाविस्कर यांचा मुंबई येथे साहित्यभूषण पुरस्काराने सन्मान
मुंबई येथील कलासाधना साहित्य संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना गौरविण्यात येते यावर्षी ग्रामीण भागातील नांद्रा येथील कवी लेखक स्वप्नील बाविस्कर यांच्या अप्रकाशित काव्यसंग्रह शेतकरी मायबाप काव्यसंग्रह साठी व साहित्य क्षेत्रातील प्रभावी लेखनशैली साठी नुकताच कामोठे नवी मुंबई झी मीडियाचे वृत्तनिवेदीका सौ अनुपमा खानविलकर यांच्या हस्ते साहित्य भूषण पुरस्कार .सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सुवर्णपदक देऊन त्यांना गौरविण्यात आले.शेतकरी कवी म्हणून अनुपमा खानविलकर यांनी विशेष संवाद साधला.या कार्यक्रम प्रसंगी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सौ डॉ कविता चोतमल व पोलिस इन्स्पेक्टर रत्ना खंडेलवाल ,सिने अभिनेत्री संजना व नगरसेविका सौ नेत्रा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी कला साधना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सौ मेघा महाजन व श्रीराम महाजन यांनी यशस्वी आयोजन केले. या पुरस्कारासाठी कवी स्वप्नील बाविस्कर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे कवी स्वप्नील बाविस्कर यांना या अगोदरही महाराष्ट्रभरातून विविध प्रकारचे साहित्य व काव्य संदर्भात पुरस्कार मिळाले आहेत