प्रमोद परदेशी यांची भारत सरकार दूरसंचार कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य पदी निवड करण्यात आली.

0
528

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, ३० एप्रिल २०२२
प्रमोद परदेशी यांची भारत सरकार दूरसंचार कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य पदी निवड करण्यात आली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भाजप भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी यांची केंद्र सरकारच्या दूरसंचार उपक्रम भारत संचार निगम लिमिटेडमध्ये पुणे विभाग टेलिफोन सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
भारत सरकार, दूरसंचार कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे पुणे विभागीय सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे सल्लागार म्हणून भाजप भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोद परदेशी यांच्याकडे ग्राहकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रमोद परदेशी यांनी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला दूरसंचार कॉर्पोरेशन लिमिटेडचे सल्लागार समितीचे सदस्य बनवल्याने आय. टी. क्षेत्रातील युवक वर्गात जागृत निर्माण होईल.
यावेळ भाजपा नेते गिरीश महाजन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय अयोग्य राज्यमंत्री भरतीताई पवार, जळगांव लोकसभा खासदार उन्मेश दादा पाटील, भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा आमदार नरेंद्र पवार, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा पिंपरी चिंचवड अध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे, धनगर समाज अध्यक्ष बापूसाहेब शिंदे व भाजपचे कार्यकर्त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिले.