पाचोरा शहरातील २५ खुले भुखंडासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असुन महिन्याभरात कामांना सुरूवात होणार — आमदार किशोर आप्पा पाटिल

0
317

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, ३० एप्रिल २०२२

पाचोरा शहरातील २५ खुले भुखंडासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असुन महिन्याभरात कामांना सुरूवात होणार — आमदार किशोर आप्पा पाटिल
शहरातिल २५ खुले भुखंडांचे होणार सुशोभिकरण
५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असुन लवकरच कामाला होणार सुरूवात — आमदार किशोर पाटिल
शहराच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पुर्ण करतांना विविध काॅलनी भागातील असलेले खुले भुखंड (ओपन स्पेस) याचे सुशोभिकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील काम हाती घेतले असुन शहरातील २५ खुले भुखंडासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असुन महिन्याभरात कामांना सुरूवात होणार असल्याची माहीती आमदार किशोर पाटील यांनी दिली. आज दि. ३० एप्रिल रोजी शिवालय या संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पञकार परिषदेला आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दिकर, मा. नगरसेवक डाॅ. भरत पाटील, राम केसवानी, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, वाल्मिक पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजु पाटील व प्रविण ब्राम्हणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले की, मतदार संघासा सर्वांगिण विकास साधतांना पाचोरा शहरातिल विविध काॅलनी भागातिल ओपन स्पेस यांचे सर्व सोईयुक्त सुशोकरण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासुन हाती घेतले आहे. शहराचा विस्तार पाहता शहरात सुमारे १००  ते ११० खुले भुखंड असुन यातिल ५० ओपन स्पेसचे काम पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले असुन दुसर्‍या टप्प्यात शहरातील २५ ओपन स्पेसला शासनाकडुन ५  कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला असुन महिन्याभरात या कामांना गती मिळणार आहे. या २५ भुखंडांमध्ये  विष्णु नगर, भास्कर नगर, कालिका नगर, गाडगेबाबा नगर, शांतीनगर आदर्श नगर, जिजामाता काॅलनी, दुर्गा नगर, कृष्णापुरी, स्वामी समर्थ नगर, रामदास ठाकरे नगर, नारायण नगर, अब्दुल हमिद नगर, आनंद नगर, चिंतामणी काॅलनी, पवन नगर, साई पार्क, वृंदावन काॅलनी, बळिराम नगर, ओ. ना. वाघ नगर, सदगुरू नगर, मल्हार नगर, स्वामी समर्थ नगर, दामजी नगर व मयुर पार्क या २५ ओपन स्पेसला प्रत्येकी  २० लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या विकासाला गती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार व नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले  आहे. शहरातील उर्वरित सर्वच ओपन स्पेस पुढिल  आठ दिवसात मंजुर करून आणुन शहरातील १०० टक्के खुल्या भुखंडाचा सुशोभित विकास साधला जाणार आहे.या निमित्तांनी शहरातिल सर्व नागरिकांना जाहिर अवाहन करतो की, उत्तर महाराष्टात पाचोरा हे पहिले शहर असेल ज्या शहरातिल सर्व ओपन स्पेस सुशोभिकरण झालेले असेल.या सुशोभित खुल्या भुखंडाचा झालेला विकास टिकउन ठेवण्यासाठी व ते वृध्दिंगत करण्यासाठी त्या त्या परिसरातिल नागरीकांनी व तरूणांनी पुढाकार घेउन  त्याची निगा राखणे व काळजी घेण्याची जबाबदारी घेतल्यास सुंदर शहराचे स्वप्न पुर्ण होण्यास वेळ लागणार नाही.