कुऱ्हाड येथे डी.वाय.एस.पी.भरतजी काकडे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे दिले आश्वासन, कुऱ्हाड ग्रामस्थांनी स्थगित केले आंदोलन.

0
467

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, ३० एप्रिल २०२२

कुऱ्हाड येथे डी.वाय.एस.पी.भरतजी काकडे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे दिले आश्वासन, कुऱ्हाड ग्रामस्थांनी स्थगित केले आंदोलन.
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या पावन भुमित पुरातन श्री. प्रभु रामचंद्र (राममंदिर), श्री. विठ्ठल, रुखमाई मंदिर, महादेव मंदिर, १५० वर्षाची परंपरा असलेले श्री. खंडेराव महाराज मंदिर व याच गावातील एक त्याग मुर्ती हरिदास महाराज यांची सन १९९६ सालापासून असलेली समाधी असलेले भूमिपुत्रांचे गाव सर्वधर्मसमभाव ठेवून कुस्तीच्या आखाड्यात येथील पहिलवानांनी आखाडा गाजवून नावलौकिक असलेले हे गुण्यागोविंदाने नांदत असलेले हे गाव आहे.
मात्र या गावाला मागिल काही वर्षांपासून सट्टा, पत्ता, जुगार व देशी, विदेशी व गावठी दारु निर्मीती व विक्रचे ग्रहण लागले. हे अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत जाऊन या अवैध धंद्यामुळे गावात अशांतता पसरली लहान, थोर अल्पवयीन मुलांसह तरुण व जेष्ठ नागरिक या व्यसनाच्या आहारी जाऊ लागले. यामुळे गावात दररोज भांडणतंटे, घराघरात अशांतता पसरली यातुनच अनेक तरुण मुले दारुच्या आहारी गेल्यामुळे अल्पवयात हे जग सोडून गेले तर काही तरुणांचा संसार फुलत असतांनाच त्यांच्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडल्याने काही माता, भगिनींना भर तारुण्यातच आपले सौभाग्य गमावण्याची वेळ आल्याने या परिसरातील लहान मुलाबाळांचे पितृछत्र हरवले होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत म्हणून मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य काही समाजसेवक व सुज्ञ नागरिकांनी कायद्याच्या रक्षकांकडे वारंवार ग्रामपंचायतीचे ठराव, गावातील महिला मंडळाने वारंवार अर्जफाटे करुन सुध्दा कुऱ्हाड गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होत नसल्याने हे अवैध धंदे करणारे गावात दादागिरी करून कुणालाही अजीबात जुमानत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी व महिलांनी कुऱ्हाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील आठवड्यात पाचोरा, भडगाव, जामनेर विभागाचे पोलिस अधिकारी डी. वाय. एस. पी. भरतजी काकडे साहेब यांच्याकडे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साकडे घातले होते. व हे अवैध धंदे बंद न झाल्यास आम्ही १ मे २०२२ रविवार महाराष्ट्र दिनापासून पाचोरा येथील डी. वाय एस. पी. कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते.
याची दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार व डी. वाय. एस. पी. मा. श्री. भरतजी काकडे साहेब यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना कडक सुचना देऊन कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी धाडसत्र राबवून कुऱ्हाड गाव परिसरातील सट्टा पेढ्या, गावठी दारु निर्मीतीच्या भट्ट्या व दारु विक्रीच्या ठिकाणावर धाडसत्र राबवून धडक कारवाईचा धडाका लावला होता.
परंतु मागील काही वर्षांपासून वारंवार अर्जफाटे करुन सुध्दा कुऱ्हाड गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होत नसल्याने कुऱ्हाड ग्रामस्थांचा पोलीस यंत्रणेवरचा भरवसा उडाला होता. म्हणून त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२२ रविवार रोजी आंदोलन करणारच अशी भुमिका घेतल्यामुळे आज दिनांक ३० एप्रिल २०२२ शनिवार रोजी पाचोराचे कर्तव्यदक्ष डी. वाय. एस. पी. मा. श्री. भरतजी काकडे साहेब व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी कुऱ्हाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमेटीची बैठक घेऊन या बैठकीत कुऱ्हाड ग्रामस्थ व महिलांच्या समस्या समजून घेत गावातील अवैध धंद्या बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. या शांतता कमेटीच्या बैठकीत सुरवातीला डी. वाय. एस. पी. मा. श्री. भरतजी काकडे साहेब यांचा सत्कार सरपंच पती मा. श्री. कैलास भगात व सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांचा सत्कार उपसरपंच मा. श्री. अशोक देशमुख यांनी शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन केला.
या शांतता कमेटीच्या बैठकीत अवैध धंदे करणारे व पोलीस यंत्रणेतील काही भ्रष्ट कर्मचारी कारवाईचा फक्त देखावा करतात व तोडी पाणी करुन अवैध धंदे करणारांची पाठराखण करतात म्हणून कुऱ्हाड गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होत नसल्याचा आरोप कुऱ्हाड गावातील महिला मंडळाने व ग्रामस्थांनी बोलून दाखवत पोलीस व अवैध धंदे करणारांचा सुरू असलेल्या खो, खो च्या खेळाबाबात संताप व्यक्त करत कडवट शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काही महिलांनी आमच्या कुऱ्हाड गावात अवैध धंदे करणारे कसा नंगा नाच करतात ते उदाहरणांसह पटवून देत हे अवैध धंदे करणारे व्यसनाधीन लोकांच्या मोटारसायकल, सोने, संसारपयोगी वस्तू गहाण ठेवून व्याजासह रक्कम वसूल करतात असेही सांगितले.
तसेच कुऱ्हाड गावातील भररस्त्यावर, मराठी मुलांच्या शाळेजवळ, मंदिर परिसरात, महिलांच्या शौचालयाजवळ तसेच भरवस्तीत रात्रंदिवस सट्, पत्ता, जुगार, देशी, विदेशी व गावठी दारुची खुलेआम विक्री केली जाते त्यामुळे महिलांना दैनंदिन कामानिमित्त किंवा शेतात जाता, येता या व्यसनाधीन लोकांचा त्रास सहन करावा लागतो तसेच दारु पिऊन दारुडे भररस्त्यावर किंवा भरवस्तीत मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करतात याचा महिलावर्गाला खुपच त्रास सहन करावा लागतो असे सांगितले.
ही सगळी परिस्थिती जाणून घेत मी स्वता कुऱ्हाड गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जातीने लक्ष घालून जे, जे अवैध धंदे करणारे आहेत तसेच जे, जे लोक या अवैध धंदे करणारांची पाठराखण करतात उदाहरणार्थ ज्यांच्या शेतात किंवा बांधावर दारु गाळण्याच्या भट्ट्या आढळून येतील त्या, त्या शेतमालकाला सुध्दा आरोपी करण्यात येईल तसेच जे कुणी दुकानदार दारु निर्मीतीसाठी लागणारा काळा गुळ, नवसागर व मोहाची फुले विकतांना आढळून येईल त्यांच्यावरही कडक करण्यात येईल असे सांगितले तसेच ज्या ठिकाणी किंवा जागेवर दारु विक्री, सट्टा बिटींग किंवा जुगाराचा अड्डा चालवला जाईल तेथील टपरी व इतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल एवढे करुनही जर अवैध धंदे करणारे जुमानत नसतील तर त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात येईल अजून कायद्याच्या चौकटीत राहून जी काही कारवाई करता येईल ती कारवाई आम्ही करुन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन डी. वाय. एस. पी. भरतजी काकडे साहेबांनी दिल्यानंतर कुऱ्हाड ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांनी १ मे २०२२ रविवार रोजीचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.
या शांतता समितीच्या बैठकीस सरपंच पती कैलास भगत, उपसरपंच अशोक देशमुख, पोलिस पाटील संतोष सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कौतिक पाटील, डॉ. प्रदीप महाजन, जमील काकार, समाधान पाटील, रमेश मुके, मनोज शिंपी, अशोक बोरसे, शेतकरी सेनेचे अरुण भाऊ पाटील, पत्रकार बांधव तसेच गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लोकमतचे पत्रकार मा. श्री. सुनील लोहार यांनी उपस्थीतांचे आभार माणूस या बेठकीची सांगता करण्यात आली