१ मे २०२२ महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे मा. नामदार श्री. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर अभियानाच्या स्टॉलचे उदघाटन करुन समाज कल्याण विभागाच्या योजना मार्गदर्शिका पुस्तिकेचे प्रकाशन केले

0
266

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, १ मे २०२२

१ मे २०२२ महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे मा. नामदार श्री. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर अभियानाच्या स्टॉलचे उदघाटन करुन समाज कल्याण विभागाच्या योजना मार्गदर्शिका पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी मा. श्री. अभिजित राऊत जिल्हाधिकारी, मा.श्री. डॉ. प्रविण मुंडे पोलीस अधिक्षक, मा. श्री. डॉ. पंकज आशिया मुख्य कार्यकारीधिकारी, जि.प. जळगाव सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील श्री. विजय रायसिंग समाज कल्याण अधिकारी जि.प. जळगाव उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मा. नामदार श्री. धनजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण महाराष्ट्रभर समाज कल्याण विभागाच्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा व तळागळातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ मिळावा या हेतुने समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर अभियान महाराष्ट्र दिनी सुरु करण्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते योजनांची माहिती देणा-या स्टॉलचे उदघाटन करुन आला. यावेळी ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागाचे सर्व कर्मचारी सर्व महामंडळाचे कर्मचारी, तालुका समन्वयक, बार्टी संस्थेचे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.