पाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

0
130

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, ४ मे २०२२

पाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पाचोरा येथील कृषापुरीतील रहिवाशी तथा फोकस न्युजचे मुख्य संपादक सचिन (बाला) मधुकर पाटील (वय – ४५) यांचे दि. ४ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने दुःखद निधन झाले. सचिन पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचेवर आज दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते गो. से. हायस्कूलचे शिक्षक रुपेश मधुकर पाटील यांचे लहान बंधू होत. सचिन पाटील यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.