जवखेडेसिम प्र उत्राण विकास सोसायटी मध्ये, एतेहासिक परिवर्तन . दिनेशबापू आमले ,वासुदेव पाटील यांच्या पॅनल ला एकतर्फी सत्ता तर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांच्या पॅनल चा सुपडा साफ.
आरोग्य दूत न्यूज रईस बागवान, शहर प्रतिनिधी दि, ५ मे २०२२
जवखेडेसिम प्र उत्राण विकास सोसायटी मध्ये, एतेहासिक परिवर्तन . दिनेशबापू आमले ,वासुदेव पाटील यांच्या पॅनल ला एकतर्फी सत्ता तर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांच्या पॅनल चा सुपडा साफ. जवखेडेसिम ता एरंडोल येथील विकास सोसायटीचे मतदान दि. ४ रोजी घेण्यात आले मतदान संपल्यानंतर दुपारी ४ वाजेपासून जिल्हा परिषद शाळेत च्या सभागृहात मतमोजणी झाली, सुरवातीला महिला राखीव मतदार संघातून सौ अल्काबाई लोटन पाटील, सौ लिलाबाई सुभाष पाटील ह्या प्रचंड बहुमतांनी निवडून आल्या, त्या नंतर विमुक्त भटक्या जाती मतदार संघातून गोसावी मुरलीधर धर्मागिर गोसावी निवडून आले,अनुसूचित जाती मतदार संघातून सोनवणे उत्तम चिंतामण यांचा मोठ्या फरकाने विजय प्राप्त झाला,इतर मागास प्रवर्गातून प्रेमराज पाटील यांचा विजय झाला,खुल्या कर्जदार/खातेदार मतदार संघातून (१ आमले गोपीचंद बळीराम (२ ज्ञानेश्वर सखाराम पाटील 3 हिंमत जयराम चौधरी 4 हिंमत प्रेमराज पाटील (५ यादव माधवराव पाटील (६ कैलास प्रल्हाद पाटील (७ अभिमन रामदास पाटील (८ खेमणार रमेश चिंतामण या सर्व उमेदवारांचा मोठया फरकाने एकतर्फी विजय झाला ,या पॅनलच्या विजयासाठी प्रथम लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले, वासुदेव पाटील शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांनी शर्तिचे प्रयत्न केले,गावातील सर्व ग्रामस्थांनी आनंद व जल्लोष व्यक्त केला.