महिला दिनानिमित्त बहिणाबाई चौधरी यांना समर्पित शब्दशिल्प कलाविष्कार संघ यांच्या कडून विशेष प्राविण्य प्राप्त कविता

0
152

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, ५ मे २०२२

महिला दिनानिमित्त बहिणाबाई चौधरी यांना समर्पित
शब्दशिल्प कलाविष्कार संघ यांच्या कडून विशेष प्राविण्य प्राप्त कविता

शीर्षक. खानदेशची आई

खानदेशची आई
बहिणाबाई अशी
गाऊ नवलाई
शब्दात कशी

खुप सोसला
ऊन – साऊलीचा खेळ
तरी बसविला
संसाराचा मेळ

किती झिजली
संसारासाठी
जरी हरवली
हातातून काठी

आनंद जीवनात
पाहिलाच नाही
शेतात रबतांना
झाली तनाची लाही

निरक्षर काव्य
शब्दात मांडल
कष्ट करतांना
ओठांवरून सांडल

” बहिणाबाईंची गाणी ”
बनला काव्यसंग्रह
सुक्ष्म निरिक्षणांनी
चमकला एक ग्रह.

स्वरचित कविता
सौ निता प्रवीण शेंडे, पाचोरा , जि. जळगाव.