रुग्णवाहिकेसमोर अचानक आल्याने मोटरसायकल चालकाचा मृत्यू

0
1847

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान, 
शहर प्रतिनिधी
दि, ७ मे २०२२
रुग्णवाहिकेसमोर अचानक आल्याने मोटरसायकल चालकाचा मृत्यू
पाचोरा (प्रतिनिधी)-
रूग्णवाहिकेसमोर मोटारसायकलस्वार अचानक आल्याने या धडकेत
मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नशिराबादजवळ घडली.
एम. एच. १४ सी.एल. ०८०१ या क्रमांकाची (१०८ रूग्णवाहीका) भुसावळ येथून रूग्णाला घेऊन जळगावकडे येत  असतांना नशिराबादजवळ राष्ट्रीय महामार्गावर एम. पी. ०९ एक्स.एफ‌. ७२२२ या क्रमांकाच्या मोटारसायकलस्वार अचानक रुग्णवाहिकेसमोर आल्याने. या धडकेत रोशन कुमार जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक अपघातस्थळी धावले. त्यांनी रोशन कुमारला जळगाव रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयत रोशन कुमार हा बिहारमधील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांकडुन प्राप्त झाली आहे.घटनेचा पुढील तपास नशिराबाद पोलिस करित आहे.