आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि. ९ मे २०२२
पाचोरा पोलिसांची चमकदार कामगिरी
पाचोरा येथे दि.७ / ५ / २०२२ रोजी मनोज हिरामण मिस्तरी (वय – ४६) धंदा – मजुरी रा. कोंडवाडा गल्ली यांच्या मालकीची ज्युपिटर मोटरसायकल (क्रं. एम. एच. डी. एल. १०३२) ही शहरातील संघवी काॅलनी परिसरातून चोरीस गेली होती. मनोज मिस्तरी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरीची फिर्याद दिली असता त्या तक्रारीवरून तात्काळ या घटनेची दखल घेत तपास चक्रे फिरवत व सी. सी. टि.व्ही. फुटेजच्या सहाय्याने काही तासांमध्येच चोरट्यांचा व मोटर सायकलचा तपास लावण्यात आला. सदरची मोटरसायकल शहरातील एम. एम. महाविद्यालयाच्या मागील बाजुस आढळुन आली. या प्रकरणी आरोपी प्रमेश्वर राजेंद्र पाटील (रा. शिवकॉलनी, पाचोरा) व नितीन भावुराव पाटील (रा. बाहेरपुरा, पाचोरा) यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक विश्वास देशमुख व पो.शिपाई योगेश पाटील हे करीत आहे.