
आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दि,१०/५/२०२२
पाचोरा तालुका एकलव्य संघटने मार्फत,उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुका येथील एकलव्य संघटने मार्फत आज दि. १०/५/२०२२ रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी यांना पुनर्वसन जागेतील अतिक्रमणा बाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात मांडकी खुर्द ता. पाचोरा येथील पुनर्वसन जागेतील धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आले आहे. सदर मांडकी गाव पुनर्वसनासाठी गेल्या आठ ते दहा वर्षा पासून प्रस्तावित आहे.त्यासाठी पूनगाव शिवारातील गट नं. 12 गावठाण निश्चित केलेला असून याठिकाणी जवळ जवळ बारा ते पंधरा लोकांनी या जागेत घरकुल ग्रामपंचायती मार्फत बांधून दिले आहे. बाकी ची जागा पुनर्वसनासाठी आहे.परंतु या ठिकाणी काही धनदांडगे या सरकारी जागेवर मोठी मोठी शेड, खळे तसेच आजूबाजूचे शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जागेत अतिक्रमण करीत आहे. त्यांना हटकले असता ते आम्हास खोट्या केसेस करण्याच्या धमक्या देतात आम्ही गावात ९० टक्के आदिवासी भिल्ल समाजाचे लोक राहतात गरीब व मोल मजुरी करून जीवन जगत असतो बाहेर गावातील बरेच लोक या पुनर्वसन जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावत आहेत. तरी प्रशासनाने आमची मागणी वर लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही वरिष्ठ पातळीवर तक्रार करू आम्हाला न्याय नाही भेटलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मागणी पाचोरा तालुका एकलव्य संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. सदर या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी,जळगाव तहसीलदार पाचोरा, पोलीस निरीक्षक पाचोरा आमदार पाचोरा भडगाव यांना पाठविण्यात आलेली आहे.अशी माहिती कळते निवेदन देतेवेळी प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुधाकर वाघ तालुकाध्यक्ष गणेश वाघ व मांडकी खुर्द गावातील ५६ ग्रामस्थांनी सह्या करून निवेदन दिले व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.