आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि. १० मे २०२२
पाचोरा येथील ऐतिहासिक “जामा मशिद” परिचय व आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील दिनांक ८/ ५/ २०२२ रोजी ऐतिहासिक जामा मशीदीचा परिचयाचा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला या आजच्या प्रतिकूल वातावरणात आवश्यक असलेल्या कार्यक्रमात जामा मशिद चे प्रमुख ट्रस्टी व अध्यक्ष श्री अब्दुल रशीद देशमुख (उर्फ बाबूजीं) यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहील, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, डॉ.असोसिएशनचे अध्यक्ष, वकील, टीचर व सर्व धर्मीय, सर्व पक्षीय हिंदू-मुस्लीम नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते
आपल्या प्रास्ताविक भाषणात रसीद बाबूजींनी मशिदीची माहिती व मशिदीत दिवसातून पाच वेळा नमाज पठण व आजान संबंधी माहिती दिली
या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित असलेले इस्लाम धर्माचे अभ्यासक “श्री अमीर सोहेल” साहेब ( प्राचार्य ईकरा) संस्था जळगाव यांनी इस्लाम धर्म संबंधित असलेले समज-गैरसमज आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने दूर केले उपस्थितांना प्रथमच सद्यस्थितीची माहिती ऐकून आश्चर्याचा सुखद धक्का बसला असे कार्यक्रम सतत होत राहणे किती आवश्यक आहेे. अशी चर्चा उपस्थितांमध्ये होताना दिसली
या कार्यक्रमात आमदार,माजी आमदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात उपस्थित असलेले ,सामाजिक कार्यकर्ते,खलील देशमुख,मा. नगरसेवक बशीर बागवान, दत्ता बोरसे, माजी उपाध्यक्ष शरद पाटे, धनराज पाटील आरोग्य निरीक्षक ,अझर खान, शहराध्यक्ष रा. का. पार्टी विकास पाटील तालुकाध्यक्ष रा. काँ., किशोर बारावकर शिवसेना शहर प्रमुख दुष्यंत रावल, सचिन सोमवंशी तालुकाध्यक्ष आय काँग्रेस सामाजिक कार्यकर्ते, श्री बापु सोनार,श्री नंदु सोनार, डॉ अनिल झवर, डॉ दिनेश सोनार, प्रदिप मालपुरे, अनिल येवले .गणेश पाटील रणजीत पाटील नितीन तावडे मुक्तार शा आरिफ खान नासिर बागवान, मा. नगरसेवक रसूल शेठ नईम सौदागर, राजू पाटील, खान कंडक्टर, डॉ.आलम देशमुख,हारुण देशमुख ,शाकीर बागवान, वाजीत बागवान, मतीन बागवान अन्सार पटवे आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात सर्वांना शीरखुर्मा वाटप करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दानिश देशमुख ,डॉ.सुवेद देशमुख ,युनुस बागवान मुजाईद देशमुख, यांनी परिश्रम घेतले व त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली