पाचोर्‍यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी रथोत्सव साजरा

0
383

   पाचोरा 

  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पारंपरिक रथाचे पूजन रविवारी सकाळी श्री. भालचंद्र निंबाजी पाटील व सौ. संगीता भालचंद्र पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने करण्यात आला . पाचोरा येथील बालाजी महाराजांच्या रथाची परंपरा सुमारे १८७ वर्षापूर्वी अर्जुन पाटील यांचे वंशज रामा पाटील व त्यांचे भाऊ श्यामा पाटील यांनी सुरू केली. श्यामा पाटील हे दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारी करायचे. एकदा ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारीला गेलेले असताना चंद्रभागा नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेले असताना नदीच्या प्रवाहात हात घातलेला असतांना त्यांना श्री बालाजी महाराज यांची दगडी मूर्ती त्यांना दिसली. परमेश्वर त्यांना प्रसन्न झाला या भावनेनं त्यांनी ती मूर्ती दिंडीसोबत पाचोर्‍याला आणली आणि घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या भावांना सांगितला. श्यामा पाटील यांना अपत्य नसल्याने त्यांच्या वाट्याला आलेल्या संपत्तीचा उपयोग त्यांच्या सर्व भावांनी पाचोरा येद बालजी मंदिर तयार करण्यासाठी केला. त्यांनी अनेक ठिकाणांची पंडित व महंत यांना बोलावून त्यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली . तेव्हापासून रथाची मिरूवणुकीचा उत्सव सुरू झाला.