पाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान

0
1376

 

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि,१६/५/२०२२
पाचोरा पोलिस स्टेशनचे अमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२२ लोकांनी केले उत्साहात रक्तदान
पाचोरा पोलिस स्टेशनचे अंमलदार श्री राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवसा निमित्त व रेड ब्लड बँक जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.पाचोरा पोलिस दलात कार्यरत असलेले सर्वांना हवे हवे से वाटणारे राहुल साहेबराव बेहरे यांच्या वाढदिवस छ.शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात संपन्न झाला. दि.१६/५/२०२२ रोजी सकाळी ८ वाजेपासून वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात भरपूर प्रमाणात लोकांनी रक्तदान केले रक्तदान शिबिरात १२२ लोकांनी रक्तदान केले राहुल बेहरे हे व्यक्तिमत्व सर्वांना परिचित असलेले व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या वाढदिवसाला भरपूर प्रमाणात लोकांनी उत्साह दाखविला व त्यांना शुभेच्छा दिल्या पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहरे हे २४ तास सदैव कर्तव्यास बांधील असतात पोलीस दलात कार्यरत असताना सुद्धा आपल्या कर्तव्याचे पालन करून सोबतच अविरत सामाजिक बांधिलकी जोपासत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असे पाचोरा शहरात व तालुक्यात राहुल भैया यांचं नाव लौकिक झालेला आहेत् यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उपस्थित असलेले माजी आमदार दिलीप वाघ मा.नगराध्यक्ष संजय गोहिल शिवसेना युवा नेते सुमित पाटील , जि प सदस्य पदम बापु, शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर भाजपाचे अमोल शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, नगरसेवक वासुदेव महाजन, नगरसेवक बशीर बागवान, सामाजिक कार्यकर्ते दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी विनायक दिवटे, पीबीसी मातृभूमी न्यूज चॅनेल तथा लोकसत्ता वार्ताहर प्रविण ब्राह्मणे , सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले, पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक चौबेे, सर्व पत्रकार बांधव व सर्व पोलिस कर्मचारी व कृष्णापुरी येथील भैय्या भाऊ मित्र परिवार उपस्थित होते.