अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण प्रबोधन शिबीर संपन्न!

0
214

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दि,२३/५/२०२२

आज दिनांक २३ – ०५ – २०२२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय लातुर व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन देवणी जिल्हा लातूर येथे जादुटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रबोधन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते
हे प्रशिक्षण देवणी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा गणेश सोंडारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, यावेळी देवणी पोलिस स्टेशन चे सहा, पोलिस निरीक्षक मा मुजाहिद शेख साहेब यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून उदघाटन करण्यात आले,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांनी प्रबोधनाचे गीत घेऊन व प्रशिक्षणाच्या मागील भूमिका विशद करून कार्यक्रमाची सुरुवात केली, तसेच जादूटोणा विरोधी कायद्याबाबत चमत्काराचे प्रयोगासह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्‍हा प्रधान सचिव, सुधीर भोसले यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची माहीती दिली, यावेळी पत्रकार संघाचे देवणी तालुकाध्यक्ष मा कोतवाल साहेब यांची उपस्थिती होती, या कार्यक्रमास देवणी पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,अंगणवाडी सुपरवायझर, कार्यकर्ते, मदतनीस,अशा वर्कर्स व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मा गणेश सोंडारे साहेब यांनी केला,
कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवणी पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार धनंजय शिवगुंडे व पो हे कॉ विनायक कांबळे व सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
अनिल दरेकर, जिल्हा कार्याध्यक्ष लातूर
महा. अंनिस