एरंडोल विधानसभेतील पारोळा शहरात जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांचे शिव संपर्क अभियान यांचे बॅनर फाडल्या कारणाने शिवसेनेत पुन्हा दांगडो

0
169

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि,२८/५/२०२२

एरंडोली येथे शिवसेना पक्षाचे शिव संपर्क अभियानात दांगडो
एरंडोल विधानसभा मतदारसंघात पारोळा येथे शिव संपर्क अभियानाचे आज आयोजन करण्यात आले होते या शिव संपर्क अभियानात संपर्क प्रमुख संजय सावंत हे उपस्थित असताना पक्षात गटबाजीचे राजकारण दिसून आले एका अज्ञात माथेफिरू व्यक्तीने जिल्हाप्रमुख हर्षल माने यांचे बॅनर काल रात्री फाडले असता संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यक्रमात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेने जिल्हाप्रमुख हर्षल माने हे संतप्त झाले होते त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगतांना आमचे आराध्य दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पालक मंत्री गुलाबराव पाटील शिवसेना नेते संजय राऊत उपनेते लक्ष्मण वडले यांचे फोटो असलेले बॅनर अज्ञात माथेफिरू व्यक्तींनी फाडले होते अशीच घटना मागच्या वर्षी झाली होती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे बॅनर फाडण्यात आले होते ज्या कोणाला खेटायचं असेल त्यांनी सरळ सरळ माझ्याशी खेटावे मग त्यांना मी दाखवून देईन असे त्यांनी सांगितले हा सगळा प्रकार शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या समोर झाल्याने त्यामुळे शिवसेना पक्षात सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत असे दिसते या कार्यक्रमासाठी पालक मंत्री गुलाबराव पाटील हे अनुपस्थित होते या घटनेने आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.