पाचोरा पोलिसांनी केली कौतुकस्पद कामगिरी विनापरवाना पिस्टल जमा चार जणांना अटक व गुन्हा दाखल.

0
2640

रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि,२४/६/२०२२

पाचोरा पोलिसांनी केली कौतुकस्पद कामगिरी विनापरवाना पिस्टल जमा चार जणांना अटक व गुन्हा दाखल.
सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथे आज दि. २४/६/२०२२ रोजी समर्थ व्हॅली भडगाव पाचोरा रोड निर्मल सीड्स जवळ चार चाकीतुन जाणाऱ्या चौघांना सापळा रचून त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे २५००० किमतीचे पिस्टल आणि चार चाकी वाहन हस्तगत केल्याने पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे
सविस्तर वृत्त असे की २३/६/ २०२२ रोजी मध्यरात्री ३ वाजता काहीजण अग्निशस्त्र घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांना मिळाली त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर पो सहाय्यक उपनिरीक्षक गणेश चोबे, एस आय सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, प्रवीण परदेशी, समीर पाटील या पथकाने मध्य रात्री ३ वाजता सापळा रचला असता या ठिकाणाहून इंडिका विस्टा क्रमांक एम एच १९ एक्स ९८१९ या क्रमांकाची इंडिका विस्टा थांबवत तपास केला असता पोलिसांना एक राखाडी रंगाचे पंचवीस हजार किमतीचे विनापरवाना स्टील पिस्टल मॅक्झिन सह आढळून आले पाचोरा पोलिसांनी 1) कल्पेश अनिल निकम वय २५ राहणार पाचोरा २) रोहित साहेबराव जोडगे वय २२ राहणार नाशिक ३) नितीन बाबुराव नासरे वय २२ राहणार बाळापूर जिल्‍हा अकोला ४) सचिन पाटील, वय ३१ राहणार पाचोरा या चौघांना पोलिसांनी २५००० ची विनापरवाना पिस्टल व गाडीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला सदर पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश पाटील करीत आहे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आल्याने त्यांचे व या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.