संजय गांधी, श्रावणबाळ या योजनेतील समाविष्ट लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ सुरू करावे – लहुजी विद्रोही सेनेचे तहसिलदारांना निवेदन…

0
145

रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी पाचोरा
दि,२९ / ६ /२०२२
संजय गांधी, श्रावणबाळ या योजनेतील समाविष्ट लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ सुरू करावे
– लहुजी विद्रोही सेनेचे तहसिलदारांना निवेदन… गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील भुमिहीन, अपंग, विधवा, परित्यक्ता अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाकडुन मिळणारे अनुदान मिळत नसल्याने या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली असुन त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तसेच नविन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने ठरविलेले वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये असुन हे खुपचं कमी असल्याने संबंधित तलाठी उत्पन्नाचा दाखला देत नाही. त्याकरिता २१ हजार रुपये ही मर्यादा वाढवुन ४० हजार रुपये करण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन लहुजी विद्रोही सेनेतर्फे आज दि. २८ जुन रोजी पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसिलदार मोहन सोनार यांनी स्विकारले. निवेदन देते प्रसंगी लहुजी विद्रोही सेनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कांबळे, जळगांव जिल्हा महिला अध्यक्षा रेखा कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, विलास पाटील, रेखा परदेशी, राधा मरसाळे, गेंदाबाई परदेशी, राधा परदेशी, नरसु पाटील उपस्थित होते.