कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रेल्वेची जनरल तिकीट सुविधा तब्बल अडीच वर्षानंतर सुरु

0
264

रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी पाचोरा
दि,२९ / ६ /२०२२
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रेल्वेची जनरल तिकीट सुविधा तब्बल अडीच वर्षानंतर सुरू करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच २९ जूनपासून जनरल तिकीट घेऊन मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. कोरोनाच्या काळात काही महिने रेल्वे सेवा बंद होती.
सदर रेल्वे नियमित सेवा ही कोरोना संसर्गामुळे पूर्वी 22 मार्च 2020 पासून बंद होती रेल्वे सेवा आज पासून सुरू झाल्याने सर्व प्रवाशांना आनंदाची बातमी आज रोजी मिळाली आहे.