चाळीसगाव पोलिसांनी चोरीच्या चार मोटरसायकली केल्या हस्तगत आरोपीना केली अटक
सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव शहरातील दिनांक 26/ 6 /2022 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या मालकीची 25000 किमतीची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल क्र. MH/19-Bx-1203 ही मोटरसायकल फिर्यादी सागर प्रवीण चाळीसगाव यांच्या मालकीची असल्याने त्यांनी 26/6/2022 रोजी फिर्याद दाखल केली होती ही मोटरसायकल एका अज्ञात व्यक्तीने देशमुख वाडा येथून पसार केली होती या तपासाची चक्रे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी फिरवून सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक के के पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस व पोलीस कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारावर सखोल चौकशी करून संशयित आरोपी सतीश पाटील ता.भडगाव यास पोलीस कॉ. राहुल सोनवणे विजय पाटील व विनोद खैरनार अशांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केले व गुन्ह्याचा सखोल तपास केला असता आरोपीने 25000 रुपये किमतीची शाईन मोटरसायकल काढून दिली तसेच नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या इतर गुन्ह्यातील एक आरोपीं विलास पाटील पिंपरी हाट याला अटक करण्यात आली तसेच त्याच्याकडून ही तीन मोटरसायकली असे आणि चाळीसगाव येथील एक असे चार मोटरसायकली किंमत एक लाख 25 हजार किंमतीचे पोलिसांनी जप्त केली आहे दोघांना अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस ना.राहुल सोनवणे व विनोद खैरनार विजय पाटील करीत आहे