मेहरूण तलाव परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ; गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांचा संयुक्त उपक्रम (जिल्हाधिकारी अभिजीत राऊत)

0
162

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
शहर प्रतिनिधी पाचोरा

दि,०४/७/२०२२

मेहरूण तलाव परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ; गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांचा संयुक्त उपक्रम

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव ‘सध्या पाऊस लांबलामागील वर्षी अतिवृष्टी झाली मान्सून मधील अनियमिता पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच होत आहेजैवविविधतेसह पर्यावरणाचे संवर्धन केले नाहीतर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजेयातूनच वृक्षारोपणासहवृक्षसंवर्धनाचे कार्य करावे यासाठी व्यापक स्वरूपात लोकसहभाग अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.’
मेहरूण तलाव परिसरातील सुबोनियो पक्षी घराजवळ झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होतेजैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे सुरू असलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाप्रसंगी महापौर जयश्री महाजनजिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंगमराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍडजमिल देशपांडेसचिव विजय वाणीसौसंध्या वाणीसौनिलोफर देशपांडेडॉसविता नंदनवारसौसुमित्रा पाटीलउद्योजक नंदू अडवाणीदीपक धांडेसंतोष क्षीरसागररमेश पहेलानीसमाजसेवक अनिल सोनवणेगांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजनजैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागीवरिष्ठ सहकारी अनिल जोशी उपस्थितीत होतेगांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या तीन वर्षापासून मेहरूण तलावाच्या काठावर सातत्याने वृक्षारोपणाचे काम सुरू असून झाडांची देखरेखही ठेवली जातेयामध्ये आता एक हजार झाडे लावण्यात येणार आहेयाची सुरवात आज मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपणाने झाली.
जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी वृक्षारोपण उपक्रमास शुभेच्छा देताना सांगितले की, ‘शासनाने नेहमीच पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले आहेयावर्षी शाळांसाठी रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासंबंधित लांडोरखोरी उद्यान येथे लवकरच स्टॉल लावणार असल्याचे विवेक होशिंग म्हणाले.’ जैन इरिगेशनचे अतिन त्यागी यांनी कंपनी करित असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या कार्याबद्दल सांगितलेवृक्षारोपण ही संकल्पना व्यापक स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून शास्त्रीय पद्धतीनेस्थानिक मातीत वाढणारीजैवविविधता जपणारी झाडं गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे लावली जात आहेयामध्ये समाजातील सेवाभावी संस्थाव्यक्तीसमाज सर्वांनी सहकार्य वाढवावे जेणे करून हरित जळगावचे स्वप्न साकारता येईलअसे अतिन त्यागी म्हणाले.’ ऍडजमिल देशपांडे यांनी ‘झाडे लावाझाडे जगवा’ हा ध्यास घेऊन मराठी प्रतिष्ठान व गांधी रिसर्च फाऊंडेशन करित असलेल्या कार्याविषयी माहिती दिलीविजय वाणी यांनी आभार मानलेआजच्या वृक्षारोपणाप्रसंगी रमेश पहेलानी यांच्यासह गायक कलावंतांनी योगदान दिले.
फोटो कॅप्शन – मेहरूण तलाव परिसरात एक हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाचा वृक्षारोपण करून शुभारंभ करताना महापौर जयश्री महाजनजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्ह्याचे उपवनसंरक्षक विवेक होशिंगऍडजमिल देशपांडेविजय वाणीडॉसविता नंदनवारसंध्या वाणीनिलोफर देशपांडेसुमित्रा पाटीलगांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजनजैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशीअतिन त्यागी व मान्यवर.