पाचोऱ्यात रोटरी क्लब तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

0
448

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
शहर प्रतिनिधी पाचोरा
दि ७/७/२०२२
पाचोऱ्यात रोटरी क्लब तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात
पाचोरा येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव आणि संजीवनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै “डॉक्टर दिनानिमित्त” ७ जुलै २०२२ रोजी संजीवनी हॉस्पिटल येथे सकाळी ८.३० ते ११ दरम्यान रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात 34 रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराला जळगाव येथील रेड प्लस बँकेचे आणि संजीवनी हॉस्पिटलचे संचालक तथा रोटरीचे सहसचिव डॉक्टर पवन पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी 23 रोटरी बांधव आणि इतर 11 अशा 34 सदस्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष रो. डॉ. अमोल जाधव, सचिव रो.डॉ गोरख महाजन, रो.चंद्रकांत जी लोढाया , रो.राजेशजी मोर , रो. प्रदीप पाटील , रो. रुपेश शिंदे , रो. शैलेश खंडेलवाल ,रो.डॉ. बाळकृष्ण पाटील , रो.डॉ. वैभव सूर्यवंशी, रो. शिवाजी शिंदे, रो.पंकज शिंदे, सौ ज्योतीताई पंकज शिंदे, रो.श्री निलेश कोटेच्या, रो.डॉ.नरेश गवंदे,रो. डॉ मुकेश तेली, रो.डॉ ऋषिकेश चौधरी, रो.डॉ सिद्धांत तेली, रो. डॉअतुल पाटील, रो.श्री रावसाहेब बोरसे, रो.डॉ कुणाल पाटील , रो. डॉक्टर सचिन पाटील, रो.सचिन बोरसे,रो.डॉ निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.