रईस बागवान॒ पाचोरा शहर प्रतिनिधी
१५ जुलै २०२२
सविस्तर वृत्त असे की १४ जुलै २०२२ रोजी १०८ ॲम्बुलन्स क्र.एम.एच.१४.सि.एल.०७५५ ही रुग्णवाहिका बोदवड येथील पेशंटला घेऊन जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पेशंटला सोडून मुक्ताईनगरला परत येत असताना दुपारी साडे चार च्या सुमारास समोरून येणारी आप्पे रिक्षा क्र.एम.एच.१९.सी. डब्ल्यू ०६३८ भर वेगाने येऊन १०८ अंबुलन्सला धडक दिल्याने दोन्ही वाहन पलटी झाल्या 108 अंबुलन्स मधील डॉक्टर व चालक जखमी झाले सुदैवाने कोणाचीही जीवित हानी झालेली नाही.राष्ट्रीय महामार्गावर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोर उडानपुलावर गुरुवारी दुपारी चार वाजता हा अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेतील डॉ.मेहबूब अन्सारी व रुग्णवाहिका चालक निलेश धनजी धनगर हे किरकोळ जखमी झाले.नशिराबाद पोलिस व १०८ जळगाव ॲम्बुलन्सचे एडी.एम. विनोद चौधरी. एडी एम अक्षय मोहड. डी एम डॉ. राहुल जैन हे घटनास्थळी उपस्थित होते. नशिराबाद पोलिसात या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील अधीक तपास पोलीस करीत आहे.