अंतुर्ली खुर्द ता एरंडोल येथून जवळच असलेल्या १६ गाव पाणी पुरवठा योजनेच्या फिल्टर प्लांट वरून अंदाजे ४ लाखाचे  लोखंड लंपास

0
225

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,  
शहर प्रतिनिधी
२० जुलै २०२२
सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या  फिल्टर प्लांट वरून लाखोंचे लोखंड चोरट्यानी केले लंपास.
अंतुर्ली खुर्द ता एरंडोल येथून जवळच असलेल्या १६ गाव पाणी पुरवठा योजनेच्या फिल्टर प्लांट वरून अंदाजे ४ लाखाचे  लोखंड लंपास झाले आहे, सोळा गाव ,पाणी पुरवठा योजनेचे शिखर समितीचे पदाधिकारी ११ जुलै ला १ वर्षा पासून बंद असलेल्या फिल्टर प्लांट वर गेले,त्या वेळेस फिल्टर प्लांट चे गेट व कुलूप तोडलेले  आढळले,  तिथून पंप हाऊस , व फिल्टर प्लांट  वरील ४० हॉर्स पॉवर ची १ मोटर सहित ५ व ३ च्या  मोटारी  धरून एकूण १२ मोटारी लंपास केल्या आहेत , त्यात अंतुर्ली खुर्द येथील १२ ते १४ लोक अडकण्याची शक्यता आहे,विशेष म्हणजे अंतुर्ली खुर्द ग्रामपंचायत चे दोन विद्यमान ग्रामपंचायत  सदस्यांचा समावेश आहे, एक ग्रामपंचायत सदस्य मुख्य सूत्रधार, तर दुसरा ग्रामपंचायत सदस्यांचे मालकीचे ट्रॅक्टर चोरीचे भंगार विकण्यासाठी  दहा हजार रुपये भाड्याने लावले होते, शेजारील तालुकाच्या ठिकाणी या  चोरट्यांनी हे चोरीचे लोखंड विकल्याची विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती बाहेर येत आहे, अंतुर्ली सह परिसरात या  घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कासोदा पोलिस स्टेशनला अज्ञात चोरटाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून लवकरच  चोरट्यांची नावे बाहेर येतील अशी परिसरात एकच चर्चा आहे.

चोरीचा पंचनामा करतांना कासोदा पोलीस स्टेशन चे कर्मचारी व शिखर समितीचे पदाधिकारी हजर होते.