आरोग्य दूत न्यूज रईस बागवान , शहर प्रतिनिधी २० जुलै २०२२ स्वस्त धान्य कपातीचा निर्णय मागे घ्यावा : निळे निशाण सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भैय्यासाहेब बागवान यांची निवेदनाद्वारे मागणी….. पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून त्यांना स्वस्त धान्य मिळणे हे अतिशय आवश्यक आहे. परंतु शासनाने स्वस्त धान्य कपात करून गोरगरींबानवर उपासमारीची वेळ आणलेली आहे. त्याकरिता शासनाने स्वस्त धान्य कपातीचा निर्णय हा तात्काळ मागे घ्यावा. अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे पाचोरा तहसीलदार/नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील बेघर भूमिनांना तात्काळ ग्रामपंचायतीने रहिवास प्रयोजनार्थ जागा उपलब्ध करून किंवा गोरगरीब गरजू कुटुंब ज्या जागी वास्तव्यास असतील त्या जागा नियमित करून ग्रामपंचायत नमुना नंबर ८ ला नोंद करण्यात यावी.आमच्या मागनी जनहिताची असून तात्काळ आपण मार्गी लावून गोरगरिबांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल याची नोंद घ्यावी निवेदनावर सह्या खालीलप्रमाने…… निळे निशाण सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भैय्यासाहेब बागवान , P.R.P जिल्हा उपाध्यक्ष खंडू सोनवणे तथा माजी नगरसेवक, दसरथ सोनवणे, बापू निकम, दादामियाशेख अजीज, विवेक कंखरे,राहुल मरसाळे, रवि आहिरे,विठ्ठल पाटील, सचिन पाटील,सुनील चौरे, विकास चंदनशिव, अमोल कोळी, नंदू सौदागर, इस्ताक खान, मुजमिल कुरैशी (भतिजा), आरिफ शेख भुऱ्या (लैली), नारायण शिंपी,आण्णा पाटील,इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.