अमडदे ता.भडगाव येथील ग्रामस्थांनी काढली वानरांची अंत्ययात्रा.

0
192

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी ९७६६२४४५८६

दि.२४ जुलै २०२२

अमडदे ता.भडगाव येथील ग्रामस्थांनी काढली वानरांची अंत्ययात्रा

एकीकडे माणूस माणसाला होत नसल्याचे चित्र आपणास सर्वत्र बघावयास मिळते परंतु वन प्राण्याविषयी असलेले कृतज्ञता दाखवत मृत्युमुखी पडलेल्या वानराचे विधी व अंत्यसंस्कार करून एक आगळा वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे.

आमडदे तालुका भडगाव येथे दि 19 रोजी संध्याकाळी काही वानर गाव वस्तीत घुसले असता एका नर जातीचे वानर विद्युत तारेला स्पर्श होऊन मरण पावले होते. त्याच दिवशी प.स.माजी उपसभापती संभाजी भोसले यांनी पुढाकार घेऊन मृत वानर राजाची वाजत गाजत अंत्ययात्रा काढून विधिवत अंत्यसंस्कार केले. दरवाजा गल्लीत ही घटना घडली होती.
आज पाचव्या दिवशी वानर राजाची दशक्रिया विधी व गंध मुक्ती करण्यात आली.आपले पुर्वज वानर देवता प्रती संपूर्ण दरवाजा गल्ली ने पाच दिवस दुखवटा पाळला. संभाजी भोसले यांचेसह चाळीस नागरिकांनी व बाल गोपाल मंडळींनी केश अर्पण केले.सुधाकर पाटील,दिपक पाटील,संदिप पाटील,पिंटु वायरमन,लकी,गोल्या चांभार,गौरव धोबी आदींनी पुढाकार घेऊन पाचशे नागरीकांना दुखवटा जेवण दिले.सुरेश लोहारीकर व विकास देशपांडे यांनी दुखवटा विधी पार पाडला.
अमडदे वासियांच्या या वन्य प्राण्याविषयी आत्मीयता बघून ग्रामस्थांचे सर्वोच्च स्तरातून कौतुक केले जात आहे.