जवखेडेसिम ता एरंडोल ग्रामपंचायत च्या सदस्या जिजाबाई दत्तू पाटील यांना जिल्हाधिकारी यांनी केले अपात्र 

0
600

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
२८ जुलै २०२२
जवखेडेसिम ता एरंडोल ग्रामपंचायत च्या सदस्या जिजाबाई दत्तू पाटील यांना जिल्हाधिकारी यांनी केले अपात्र 
जवखेडेसिम ता एरंडोल येथील ग्रामपंचायत सदस्या श्रीमती जिजाबाई दत्तू पाटील यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी गावठाण जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी,अपात्र घोषित केले आहे, लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे15 मार्च 2021 रोजी तक्रार दाखल केली होती, चार ते पाच हजार स्केअर फूट गावठाण जागेवर पक्के घराचे बांधकाम करून त्याचा रहिवास म्हणून वापर करत असल्यामुळे त्यांना दि 26 रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र घोषित केले आहे, तक्रारदार यांच्या तर्फे ऍड वसंत भोलाणकर यांनी काम पाहिले, या निकालामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.