पाचोरा येथे हुतात्मा स्मारक सदर्भात १५ ऑगष्ट पासुन संदीप महाजन यांचा आमरण उपोषणाचा इशारा

0
439

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
२९ जुलै २०२२
पाचोरा येथे हुतात्मा स्मारक सदर्भात १५ ऑगष्ट पासुन संदीप महाजन यांचा आमरण उपोषणाचा इशारा
पाचोरा- शहरातील पाचोरा न.पा.प्रशासनाच्या कार्यालया समोरील स्वातंत्र्य सैनीक स्व. दामोदर लोटन महाजन यांच्या नावाची असलेली सद्यस्थितीत कोनशिलेची अस्वच्छतेसंदर्भात अवस्था लक्षात घेता या ठिकाणी सुधारीत उंच स्वरूपाची कोनशिला नविन माझ्या स्व:खर्चाने मी उभारण्यास तयार असल्याचे पत्र संदीप महाजन यांनी पाचोरा न.पा.प्रशासनास दि. २९ मार्च २०२२ रोजी दिले होते याच सदर्भात प्रथम स्मरणपत्र दि.२६ मे २०२२ रोजी दिले तरी देखिल न.पा. प्रशासनाने याची आजपर्यंत दखल घेतली नाही. शिवाय पाचोरा येथील हुतात्मा स्मारकाची दुरावस्था व अस्वच्छता लक्षात घेता आज संपुर्ण देशभर स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर पाचोरा न पा प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे त्यांना जाग येणेसाठी व सदरची मागणी पुर्ण होणेसाठी दि.२८ जुलै रोजी संदीप महाजन यांनी न.पा. प्रशासनाला पत्राव्दारे इशारा दिला असुन सदरचे काम दि.१४ ऑगष्ट पर्यंत पुर्ण न झाल्यास दि.१५ ऑगष्ट २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजेपासुन सदरची मागणी पुर्ण होई पावेतो आमरण उपोषणाचा इशारा संदीप महाजन यांनी दिला आहे.