भाजपा पाचोरा यांच्या माध्यमातून व अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोऱ्यात होणार घरोघरी तिरंगा वाटप

0
256

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
०९ ऑगष्ट २०२२
भाजपा पाचोरा यांच्या माध्यमातून व अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोऱ्यात होणार घरोघरी तिरंगा वाटप
पाचोरा भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव यांच्या माध्यमातून मा.मंत्री गिरीषभाऊ महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे,खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पाचोरा शहरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हर-घर तिरंगा, घर-घर तिरंगा रॅली च्या माध्यमातून संपूर्ण शहरात तिरंगा वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे.यासाठी ०९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधत या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीच्या माध्यमातून शहरात प्रत्येक भागात जाऊन दि.०९ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट ह्या दरम्यान तिरंगा वाटप करणार आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टी पाचोरा यांच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले की भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश जगात प्रथम क्रमांकावर मार्गक्रमण करीत आहे.जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील विविध घटना यांचे स्मरण व्हावे तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना पुन्हा तेवत रहावी या उद्देशाने हा अमृतमहोत्सव मोठ्या व व्यापक स्वरूपात कसा साजरा करता येईल,यासाठी भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संपूर्ण शहरात तिरंगा वाटपाचे नियोजन करणार असून ०९ ऑगस्ट क्रांती दिननिमित्ताने हर-घर तिरंगा, घर-घर तिरंगा रॅली काढून शहरातील नागरिकांना घरपोच तिरंगा पोहोचण्याचे नियोजन करत असुन दि.०९ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण शहरात तिरंगा वाटप करण्याचा आमचा मानस आहे.असे या पत्रकात म्हटले आहे.