पाचोरा येथे हा आगळा वेगळा उत्सव कानबाईची मिरवणूक कृष्णापुरी ते कोंडावडा गल्ली भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.

0
363

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी पाचोरा
८ ऑगस्ट २०२२
पाचोरा येथे हा आगळा वेगळा उत्सव कानबाईची मिरवणूक कृष्णापुरी ते कोंडवाडा गल्ली भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.
आपली संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी अनेक सण उत्सव प्रत्येकाकडे साजरे होत असतात, प्रत्येकाकडे ते उत्सव साजरे करण्याची एक वेगळीच पद्धत असते. खान्देशात देखील रोट, कानबाई,या उत्सवाचं एक आगळं वेगळं स्वरूप आहे. सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव…
आपली संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी अनेक सण उत्सव प्रत्येकाकडे साजरे होत असतात, प्रत्येकाकडे ते उत्सव साजरे करण्याची एक वेगळीच पद्धत असते. खान्देशात देखील रोट, कानबाई,या उत्सवाचं एक आगळं वेगळं स्वरूप आहे.
खान्देशातलं सर्वात प्रसिद्ध ग्रामदैवत असा कानबाई मातेचा लौकिक, कौंटुबिक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. पंधरा दिवस आधीपासूनच उत्सवाच्या तयारीची सुरुवात होते. अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो, त्यावरची अशी आकर्षक रोषणाई साऱ्याचंच लक्ष वेधून घेते, कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप दिलं जातं. त्याला अलंकारानं मढवलं जातं, १०७ प्रकारच्या वनस्पती आणि ७ नद्यांचं पाणी आणून कानबाईची पूजा केली जाते यावेळी भाजपा अमोल भाऊ, शिवसेनेच्या सौ. वैशाली ताई, इंद्रजित पाटील, सर्व मित्र उपस्थित होते.