जवखेडेसिम लोकनियुक्त सरपंच अपात्रता प्रकरण, अप्पर आयुक्त नाशिक यांच्या आदेशाला मुख्यमंत्री यांच्या आदेशाने स्थगिती.. जवखेडेसिम ता एरंडोल येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ आमले (पाटील) यांना अतिक्रमण प्रकरणी अप्पर आयुक्त नाशिक यांनी दि २२ जुलै रोजी अपात्र ठरवले होते, लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांनी तात्काळ मुख्यमंत्री यांच्याकडे दि, २७ रोजी अपील दाखल केले होते, त्यानंतर तात्काळ स्थगिती आदेश मुख्यमंत्री यांचे सचिव यांनी २९ रोजी काढले होते, विशेष म्हणजे त्या वेळेस मुख्यमंत्री यांच्याकडे सर्व खात्यांचा कारभार होता, मुख्यमंत्री यांच्या सचिवांनी जिल्हाधिकारी जळगाव, अप्पर आयुक्त नाशिक, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तातडीने आदेश पाठवले आहेत,लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले (पाटील) यांना आज आदेश प्राप्त झाला त्यामुळे जवखेडेसिम सह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले आहे. जवखेडेसिम ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीला दोन महिन्याचा कालावधी बाकी आहे.