पाचोरा आणि भडगावांत भाजपा कार्यकर्त्यांनी घरा-घरांत पोहचवला तिरंगा

0
144

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी पाचोरा
१२ ऑगस्ट २०२२
पाचोरा आणि भडगावांत भाजपा कार्यकर्त्यांनी घरा-घरांत पोहचवला तिरंगा
पाचोरा – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव यांच्या माध्यमातून राज्याचे मंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन,जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, खा.उन्मेषदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून हर-घर तिरंगा,घर-घर तिरंगा या अभियानांतर्गत एक संकल्प करत पाचोरा व भडगाव मध्ये जवळपास २५००० तिरंग्यांचे वाटप करण्यात आले आहे.विशेष म्हणजे हा संकल्प यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविण्याचे उद्दिष्ट गाठले आहे.त्यामुळे पाचोरा आणि भडगाव मधील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त केले आहेत.दि.०९ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान राबिविलेल्या या ४ दिवसांच्या उपक्रमात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाणी-पाऊस न बघता घरा-घरात जाऊन नागरिकांपर्यंत तिरंगा पोहच केला आहे.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुरू केलेल्या या अभियानात नागरिकांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला असून नागरिक देखील उत्साहाने या अभियानात सहभाग नोंदवत आहेत.असे तिरंगा वाटप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी पाचोरा येथे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी तर भडगाव येथे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत काही भागांत स्वतःहा तिरंगा वाटप केले व नागरिकांना या मोहिमेबद्दल माहिती दिली तसेच या तिरंग्या सोबत सदर अभियानाची माहिती देणारे एक पत्र देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांना देण्यात आले आहे.त्यामुळे या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसत आहे.तसेच आगामी काळात देखील पाचोरा व भडगाव तालुक्यातील जनतेच्या सेवार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनवीन उपक्रम राबवत राहू असे अमोलभाऊ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.