आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी पाचोरा
१४ ऑगस्ट २०२२
दि.१४/८/२०२२ रोजी सकाळी पाचोरा येथील बाहेर पुरा भागात एका तीस वर्षीय मुलांनी घरांमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
तीस वर्षीय तरुणांने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाचोरा बाहेरपुरा भागात घडली अनिल डींगंबर बागुल वय तीस असे मयत तरुणाचे नाव आहे. हा मूळ पाचोरा बाहेरपुरा येथे राहात होता त्याची पत्नी रक्षाबंधन साठी मुलासह माहेरी गेली असता अनिल डींगंबर बागुल हा मुलगा पाचोरा नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामावर होता त्याचे वडील त्याला सकाळी सहाच्या दरम्यान उठवण्यासाठी त्याच्या रूम मध्ये गेले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला वडिलांनी आरडाओरड केली असता आजू बाजूचे लोक जमा झाले व त्याला खाली उतारून ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे घेऊन आले. मयत अनिल बागुल यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार होता डॉक्टर साळुंखे यांनी मर्त घोषित केले व पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहे.