स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर’ या अंतर्गत श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे विविध स्पर्धांचे व वृक्षारोपण चे आयोजन करण्यात आले

0
121

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
१४ ऑगस्ट २०२२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर’ या अंतर्गत श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे विविध स्पर्धांचे व वृक्षारोपण चे आयोजन करण्यात आले
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे श्री. डी.डी. कुमावत सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची गरज समजावून सांगितली व पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.
याप्रसंगी चित्रकला स्पर्धा वकृत्व स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक वनीकरण विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी सौ. सरिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनपाल श्री. डी.एम कोळी. व त्यांचे सहकारी तसेच शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रा. सी.एन. चौधरी श्री. अनिल येवले श्री. प्रमोद पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. पी.एम.वाघ मॅडम व पर्यवेक्षक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सौ.सरिता पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाची व शौर्याची गाथा सांगितली. श्री सी.एन.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पाचोरा शहराचा इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान स्पष्ट करून सांगितले. शाळेच्या सर्व कला शिक्षकांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील मॅडम तसेच सर्व पत्रकार बंधू व माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री. आर. एल .पाटील सर श्री.एन.आर. ठाकरे सर श्री.ए. बी. अहिरे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. आर. बी. तडवी सर विद्यालयातील स्काऊट गाईडचे शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.