आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
१६ ऑगस्ट २०२२
शहादा येथील व्यापाऱ्याने पहुरच्या धान्य व्यापाऱ्यास ८३ लाखात गंडविले
– पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल…
*पाचोरा, प्रतिनिधी* !
पाचोरा येथील मोंढाळे रोडवरील कोल्ड स्टोरेज मधुन हरभरा धान्य खरेदी करत शहादा येथील व्यापारी पहुरच्या व्यापाऱ्यास सदर मालाचे पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ करत असल्याने शहादा येथील व्यापाऱ्या विरुध्द पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील कृष्णा कोल्ड स्टोरेज व किरण कोल्ड स्टोरेज मध्ये बालाजी प्रो. प्रा. चे मालक अनिल उत्तम जैन रा. पहुर पेठ, ता. जामनेर यांनी हरभरा धान्य हे भाडेतत्त्वावर ठेवले होते. दरम्यान शहादा येथील निखिल ट्रेडर्स चे मालक निखिल हेमराज गेलडा यांनी अनिल जैन यांचेकडुन दि. १० जुन २०२२ रोजी बिल क्रं. ४२ नुसार वाहन क्रं. आर. जे. ४७ जी. ए. १९०६ यात ४०६.२५ टन हरभरा ६ हजार ३४० रुपये दराप्रमाणे, बिल क्रं. ४३ नुसार वाहन क्रं. आर. जे. ५२ जी. बी. १४६९ मध्ये ६ हजार ३६५ रुपये दराने ४०२. ३५ टन व दि. १४ जुन २०२२ रोजी बिल क्रं. ४४ नुसार वाहन क्रं. आर. जे. ०२ – जी. बी. ५४४६ यात ६ हजार ४९० रुपये दराने ३९८.१० टन हरभरा असा एकुण ७७ लाख २० हजार २५२ रुपये किंमतीचा हरभरा तसेच अनिल जैन यांचा मुलगा दिनेश अनिल जैन यांनी देखील निखिल ट्रेडर्स चे मालक निखिल गेलडा यांना ५ लाख ७६ हजार ५३३ रुपयांचा माल विकला होता. सदर मालाचे पैसे माल खरेदी केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी देण्याचे ठरले होते. मात्र एक महिना उलटुन ही सदर मालाचे पैसे मिळाले नसल्याने व निखिल गेलडा हे वारंवार खोटी आश्वासने देवुन वेळ मारुन नेत असल्याने अनिल उत्तम जैन यांच्या फिर्यादीवरून दि. १६ आॅगस्ट रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये निखिल ट्रेडर्स चे मालक निखिल हेमराज गेलडा रा. श्रीराम काॅलनी, नंदुरबार सहकारी बँकेजवळ, शहादा जि. नंदुरबार यांचे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.
Home ताज्या घडामोडी शहादा येथील व्यापाऱ्याने पहुरच्या धान्य व्यापाऱ्यास ८३ लाखात गंडविले – पाचोरा पोलिसात...