पाचोरा येथील अल्पवयीन बालिकेवर तीस वर्षीय नराधमाने केला बलात्कार ३७६ कलमाखाली गुन्हा दाखल व आरोपी अटक

0
3927

आरोग्यदूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
३१/८/ २०२२
पाचोरा येथील अल्पवयीन बालिकेवर तीस वर्षीय नराधमाने केला बलात्कार ३७६ कलमाखाली गुन्हा दाखल व आरोपी अटक
सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील आज दिनांक ३१/८/ २०२२ रोजी पाचोराा येथील दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी राहुल धनगर याने अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलवले व तिच्यावर बलात्कार केला असे फिर्यादीच्या बोलण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार होण्याच्या बेतात असताना पाचोरा पोलिसांनी काहीं तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या पाचोरा पोलिसात पाचोरा पोलिसात भाग – ०५ गुरन ३९९ भा. द. वी.  ३७६ अ, ब, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत ४ ६ /१२ प्रमाणेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास किशन नजन पाटील पीएसआय योगेश गंणगे पी एस आय जितेंद्र वल्टे. पोलीस नाईक विश्वास देशमुख. पोलीस शिपाई योगेश पाटील. व होमगार्ड कपिल पाटील करीत आहे.