पाचोऱ्यात सचिन सुप्रियाच्या जोडीने नवकार प्लाझा गणेश मंडळाची केली स्थापना

0
264

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
05 सप्टेंबर २०२२
पाचोऱ्यात सचिन सुप्रियाच्या जोडीने नवकार प्लाझा गणेश मंडळाची केली स्थापना
पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील राजे संभाजी महाराज भुयारी मार्गा लगत असलेल्या नवकार प्लाझा गणेश मंडळाच्या श्री गणेश स्थापना धुमधडाक्यात करण्यात आली.
शहरातील नवकार प्लाझा गणेश मंडळ सालाबाद प्रमाणे यंदाही गणेश स्थापना केली आहे. यावेळी स्थापना सचिन – सुप्रिया या जोडीने केली आहे. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व त्यांच्या पत्नी सुप्रीया सोमवंशी या दोघांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे राहुल शिंदे, संदीप पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, सुधीर गोडसे, जगदीश पाटील, शाम डागोर आदी उपस्थित होते