आरोग्य दूत न्यूज रईस बागवान , शहर प्रतिनिधी ०७ सप्टेंबर २०२२ पाचोरा कॉंग्रेसची संघटनात्मक बैठक संपन्न :आ. तांबे च्या उपस्थितीत पाचोरा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शहर व ग्रामीण प्रमुख पदाधिकारींची बैठक आ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. कॉंग्रेस पक्षाचे खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सह संघटनात्मक बांधणी ग्रामीण भागातील समस्यांना आवाज उठवणे आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी येथील विश्रामगृहात जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, ग्रामीण भागातील संघटन, आगामी पदवीधर मतदारसंघातील मतदान नोंदणी, असे विषय घेण्यात आले यावेळी आ. सुधीर तांबे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत माजी सभापती इस्माईल फकिरा शेख, सरचिटणीस प्रताप पाटील, आरोग्य सेल जिल्हा सचिव डॉ. अनिरुद्ध सावळे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी,ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहराध्यक्ष शरिफ शेख, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा महिला उपाध्यक्षा संगिता नेवे, युवक विधानसभा अध्यक्ष शकील शेख, युवक विधानसभा उपाध्यक्ष प्रविण पाटील, इस्माईल तांबोळी,शंकर सोनवणे, अमजद खान, प्रकाश चव्हाण, राठोड, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, समाधान ढाकरे युवक काँग्रेसचे पदाधिकारी सचिन पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, सलिम तडवी, मनोज पाटील, आदी उपस्थितीत होते