आरोग्य दूत न्यूज रईस बागवान , शहर प्रतिनिधी ११ सप्टेंबर २०२२ पाचोरा जळगाव रस्त्यावर अपघात एक जखमी एक ठार पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा जळगाव रस्त्यावर नांद्रा गावाच्या पुढे वळणावर कार आणि मोटरबाईक च्या अपघातात एक ठार एक जखमी झाला आहे जळगाव कडुन येतांना दि. ११ रोजी सायंकाळी ७.४५ वाजता मोटरबाईक स्वार भडगाव येथील यंशवत नगर मधील युवक मयत राजु रामदास कुंभार वय ४५ हा जागीच ठार झाला तर मनोज शालीक कुंभार २३ हा जखमी झाला. तर कार चालक संजय मोहरील हे देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या नातेवाईकांची सांत्वन केले. कार चालकाला ताब्यात घेतले असून पोलीस तपास करीत आहेत. या गुन्ह्य़ाची पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.