मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

0
307

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
१९ सप्टेंबर २०२२
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार, २० सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
मंगळवार २० सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी ३.४५ वा. पाळधी येथे आगमन. दुपारी ४.०० वा. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा. सायं. ४.३० वा.पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायं. ५.३० वा. मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सभेस उपस्थिती. रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे रवाना