जळगाव जिल्हा कबड्डी पंच परीक्षेत पाचोरा येथील वाजीद बागवान, जितेंद्र कासार प्रशांत सोनवणे उत्तीर्ण,

0
146

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
२४ सप्टेंबर २०२२
जळगाव जिल्हा कबड्डी पंच परीक्षेत पाचोरा येथील वाजीद बागवान, जितेंद्र कासार प्रशांत सोनवणे उत्तीर्ण,
पाचोरा- जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे 18 सप्टेंबर रोजी कबड्डी खेळातील पंच परीक्षा घेण्यात आली या जिल्हास्तरीय पंच परीक्षेत पाचोरा येथील क्रीडा क्रांती मंडळाचे सदस्य- जितेंद्र कासार , वाजिद बागवान, प्रशांत सोनवणे हे खेळाडू उत्तीर्ण झालेले आहे
या यशाबद्दल जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन भावसार, कार्याध्यक्ष- श्याम कोगटा, सहकार्यवाहक- नितीन बरडे, उपाध्यक्ष- बशीर बागवान, चंद्रकांत लोढाया, बन्सी माळी, अँड रोहन बाहेती खजिनदार- सुनील राणे ,पंचमंडळ अध्यक्ष- अलेक्झांडर मणी, चैत्राम पवार यांनी अभिनंदन केले आहे